ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान.
तळेगाव दाभाडे:
इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनी झगडे यांच्यासह तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सारिका काकडे, वैष्णवी टकले, रेखा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तनिष्का वढावकर हिने ईशस्तवन, शर्वरी हेंद्रे यांनी स्वागतगीत सादर केले.
यावेळी नयना आभाळे, उषा खोल्लम, संगीता पवार, मयुरी घोजगे, मनीषा भेगडे, वंदना केमसे, शिल्पा कुंभार, ललिता पाटील आणि भारती दरंदले यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्वेता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. सीताराम भोजने यांनी प्रास्ताविक तर मगन ताटे यांनी आभार मानले.