देहूरोड पोलिस स्टेशन तर्फे ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन
देहूरोड :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून देहूरोड पोलिस स्टेशन तर्फे ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे.
या धावण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ–२, किवळे येथून होणार असून, मार्गक्रमण सवाना चौक – स्वामी विवेकानंद चौक – देहूरोड पोलिस स्टेशन असा असेल.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या उपक्रमात देहूरोड शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शांतता समिती सदस्य, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला दक्षता समिती सदस्य, पोलिस मित्र तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले आहे.
उद्दिष्ट:
राष्ट्रीय एकात्मतेचा जागर वाढविणे व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकजुटीच्या विचारांना अभिवादन करणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.





