रूडसेट संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे –
दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने रूरल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (रूडसेट) येथे योग दिन कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात संस्थेचे संचालक, सध्या चालू असलेली फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी चे प्रशिक्षणार्थी, कर्मचारीवर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी ७ वाजता कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षित योग प्रशिक्षकांच्या श्री गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करणे व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हे होते. यावेळी संस्थेचे संचालक श्री राजकुमार बिरादार यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले आणि नियमित योगाभ्यासासाठी प्रेरित केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले