योगांच्या प्रात्यक्षिकांसहित कृष्णराव भेगडे स्कूल मध्ये साजरा झाला योग दिन
तळेगाव दाभाडे:
शनिवार दि. 21 जून 2025 रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज योग दिनाचे औचित्य साधून कृष्णाई सभागृहात योग दिन प्रात्यक्षिकांसहित साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. दामोदर कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.संदीपजी काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मिस साईलक्ष्मी, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत ,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.नीता मगर व सौ. सोनाली कदम तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवृंद कृष्णाई सभागृहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेत प्रमुख पाहुण्यांची ओळख करून त्यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . शाळेच्या मुख्याध्यापिका मिस साई लक्ष्मी व उपमुख्याध्यापिका ज्योती सावंत यांनी योगा दिनाबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रार्थना म्हटली. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या जीवनात योगा व योगासनांचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही ही प्रात्यक्षिके अतिशय उत्साहाने केली. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या कामातून व्यायामासाठी वेगळा वेळ देता येत नसल्यामुळे व आपल्या आयुष्यात योगासनांचे महत्त्व जास्त असल्यामुळे प्रत्येकाने रोज योगा करावा असे पाहुण्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरेतून आलेल्या या योगाचे महत्त्व आज सगळ्या जगाला होत आहे असेही कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाळेच्या शिक्षिका सौ.पद्मजा सातव यांनी केले.