इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शहा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी विद्या मंदिर संचालित कांतीलाल शहा विद्यालयात२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून योग प्रशिक्षक सौ. कल्याणी मुंगी व सौ श्रुती देशपांडे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विविध योगासनांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमात सौ. श्रुती देशपांडे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या आहारविषयक सवयी, विशेषतः साखरसेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, यावर मार्गदर्शन केले. त्यांनी “नो शुगर” या संकल्पनेवर भर देत, सुदृढ आरोग्यासाठी योग्य आहार व नियमित योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगासने करून या दिनाचे औचित्य साधले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या क्रीडा शिक्षिका रोहिणी बनसोडे व मुख्याध्यापिका सौ . अनन्या कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी ,उपमुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे ,अर्चना चव्हाण , सौ.सारिका तितर आदी उपस्थित होते