निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराची उत्साहात सांगता
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री. साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे दिनांक ४ मे १८मे
या १५ दिवसांच्या कालावधीत निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीर यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबीराचा सांगता समारंभ रविवार दिनांक १८मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भामचंद्र डोंगर निवासी ह.भ.प. शंकर महाराज मराठे, ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी व्यास, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अंकुशराव आंबेकर, देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकनशेठ बाफना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव कोंडे, कान्हे गावचे सरपंच विजयराव सातकर, सरपंच योगिताताई कोकरे, दिंडी समाजाचे अध्यक्ष महादूबुवा सातकर, नवजीवन पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे, नवजीवन पतसंस्थेचे संस्थापक मारूती आगळमे, उद्योजक संकेत शिंदे, माजी सभापती राजाराम शिंदे, सुवर्णाताई कुंभार, उद्योजक संतोष बोडके, संपत कदम या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सांगता समारंभाला लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ह.भ.प. श्रीमंत रमेशसिंहजी
व्यास हे होते. सकाळी ९ते ११ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे यांची किर्तनरुपी सेवा संपन्न झली. त्यानंतर श्री
पांडुरंगाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंडळ करत असलेल्या कामाचे कौतुक केले. खादी ग्रामोद्योगचे चेअरमन अंकुशराव
आंबेकर यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व बालवारकरी शिबीराचे महत्व विशद करून मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शुभाशिर्वाद ह.भ.प. शंकर महाराज मराठे यांनी दिले. यावेळी मुलांनी शिबीरात प्राप्त केलेल्या कलागुणांचे प्रदर्शन झाले. कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्यावतीने शिबीरातील विद्यार्थ्यांना विविध आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने शिबीरातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार यांनी केले. त्यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार भसे महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंडळाने आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच मंडळाकडून लवकरात लवकर मावळ तालुक्यामध्ये भव्य वारकरी भवन बांधण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिरासाठी मावळातील प्रत्येक गावागावातून व प्रत्येक घरातून मंडळाच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा मानस यावेळी मंडळाचे अध्यक्ष भसे महाराज यांनी यावेळी व्यक्त केला. संघटक गोपिचंद महाराज कचरे यांनी आभार
मानले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीपजी वावरे यांनी केले. शेवटी अध्यक्षीय समारोपाचे भाषण होवून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
निवासी बालवाकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचे हे सातवे वर्ष आहे. या शिबीरात एकूण ९०मुला- मुलांनी सहभाग घेतला. मंडळाच्या वतीेने श्री. साईबाबा सेवाधाम येथे विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व प्रशिक्षणाची उत्तम सोय केलेली होती. शिबीरार्थींना ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे, ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे, ह.भ.प. सोमनाथ महाराज सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबीरातील विद्यार्थ्यांना श्लोक, स्तोत्र, अभंगाचे पठण, गीता पाठ, टाळ व पखवाज वादन, हरिपाठ, योगा, मैदानी खेळ, तालुक्यातील जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकार यांचे मार्गदर्शन इत्यादी आध्यात्मिक गोष्टींचे शिक्षण देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव रामदास पडवळ, कोषाध्यक्ष नितीन आडिवळे बालवारकरी समितीचे अध्यक्ष काशिनाथ सातकर, उपाध्यक्ष शंकरराव खेंगले, विश्वस्त बाळासाहेब राजिवडे, कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेटे, ह.भ.प. बजरंग घारे, विश्वस्त भरतजी येवले, ज्येष्ठ कीर्तनकार
नाथा महाराज शेलार, सुभाष महाराज पडवळ, बळवंत येवले, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, कामशेत शहर अध्यक्ष शंकर खेंगले, लोणावळा शहर अध्यक्ष बाळासाहेब पाठारे, वडगाव शहर अध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष देवराम सातकर, मंडळाचे विभाग प्रमुख शिवाजीराव बोडके, निलेश शेेटे, संजय महाराज बांदल, सुखदेव गवारी, दशरथ सावंत, पंढरीनाथ वायकर, सदाशिव पेटकर, दत्ताभाऊ ठाकर, राजाराम असवले, बंडू कदम, भाऊसाहेब मापारी, रवि ठाकर, भिवाजी गायखे, रोहिदास खांडेभराड, बालवारकरी नियोजन समितीचे सचिव ह.भ.प. साईनाथ राऊत, बालवारकरी नियोजन समितीचे खजिनदार ह.भ.प. गोविंदराव सावले, वारकरी सेवा समितीचे गुलाब बधाले, मारूती देवकर, सखाराम घनवट पाटील, चंद्रकांत रामभाऊ सातकर, बाळासाहेब देशमुख, दशरथ काळे, क्रियाशील सदस्य ह.भ.प. बाळासाहेब वारिंगे, शंकरराव शेटे, नामदेव खांडभोर, भोजन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब घोजगे, रोहिदास जगदाळे, मोहन कदम, दत्तात्रय चोपडे यांच्यासह बालवारकरी नियोजन समितीच्या सर्वच पदाधिकारी व सदस्य आदींनी विशेष प्रयत्न केले.