देहू नगरपंचायतचे नगरसेवक योगेश काळोखे यांना राज्य स्तरावरील ” महाराष्ट्र रत्न ” पुरस्काराने सन्मानित
दि.22 देहूगाव : आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने देहू नगरपंचायतीचे कार्यक्षम नगरसेवक योगेश हनुमंत काळोखे यांना रविवार दि.१८ मे २०२५ रोजी ऐतिहासिक पन्हाळा गडावर झालेल्या कार्यक्रमात सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य स्तरावरील ” महाराष्ट्र रत्न गौरव ” पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भाची डुमुनी मुर्मु आविष्कार फाउंडेशन अध्यक्ष संजय पवार व आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जन डॉ.संतोष प्रभु आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देहू नगरपंचायतीच्या माध्यमातून योगेश काळोखे सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रात अविरतपणे काम करीत आहेत.गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मदत सामाजिक क्षेत्रात काम करताना तसेच क्रिडा क्षेत्रात होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मदत करणे तसेच रोटरी क्लब ऑफ देहू च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त दरवर्षी पावसापासून संरक्षण होण्यासाठी घोंगट्यांचे वाटप करत असतात.या सर्व कामाची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशन यांनी काळोखे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
देहू पंचक्रोशीतील सर्व नागरिक मित्र परिवर तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तसेच आदी मान्यवरांनी त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देल्या आहेत.