नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. संजय तथा बाळा भेगडे, तर सचिवपदी श्री. संतोष खांडगे यांची एकमताने फेरनिवड
तळेगाव दाभाडे, दि. ३०.१०.२०२५
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सन २०२५ ते २०३० सालाकरिता संस्थेच्या अध्यक्षपदी मा. राज्यमंत्री श्री. संजय तथा बाळा भेगडे व सचिवपदी श्री. संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी श्री. नंदकुमार शेलार, खजिनदारपदी श्री. राजेश म्हस्के व सहसचिवपदी श्री. विनायक अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे नियामक मंडळ खालीलप्रमाणे :
मा. श्री. संजय उर्फ बाळा विश्वनाथ भेगडे
अध्यक्ष
मा. श्री. नंदकुमार आण्णासाहेब शेलार
उपाध्यक्ष
मा. श्री. संतोष दत्तात्रय खांडगे
सचिव
मा. श्री. राजेश राजाराम म्हस्के
खजिनदार
मा. श्री. विनायक दामोदर अभ्यंकर
सहसचिव
मा. श्री. गणेश वसंतराव खांडगे
संचालक
मा. श्री. रामदास महादेव काकडे
संचालक
मा. श्री. चंद्रकांत दामोदर शेटे
संचालक
मा. श्री. यादवेंद्र दत्तात्रय खळदे
संचालक
तसेच संस्थेचे सल्लागार पदी खालील सभासदांची एकमताने निवड करण्यात आली.
मा. श्री. दामोदर तुकाराम शिंदे
सल्लागार
मा. श्री. महेश चंदुलाल शहा
सल्लागार
मा. श्री. सोनबा नागुजी गोपाळे
सल्लागार
मा. श्री. वसंत कृष्णाजी भेगडे
सल्लागार
मा. श्री. शंकर दामोदर नारखेडे
सल्लागार
संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय तथा बाळा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची उत्तरोतर प्रगती करत असताना, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. संतोष खांडगे यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेच्या २४ कार्यरत विद्याशाखांच्या प्रगतीची माहिती दिली. भविष्यकाळात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या गरजा ओळखुन संस्थेमध्ये नवनवीन विद्याशाखा सुरु करण्याचा व संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापुरकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण मानस व्यक्त केला, तर आभारप्रदर्शन सहसचिव श्री. विनायक अभ्यंकर यांनी केले.






