खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांची दमदार कारवाई…. खुनाचा प्रयत्न करणारा दिड वर्षापासुन पाहिजे असलेला सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

SHARE NOW

पुणे

खडक पोलीस स्टेशन कडील गु.र. नं २२३/२०२४ भा.न्या.सं.क.१०९, ११५ (२),१३१, ११८(१), १८९(२), १९१(२), १९० आर्म अॅक्ट क. ४ (२५), म.पो.अधि. क. ३७ (१) (३),१३५ अन्वये सराईत गुन्हेगार नामे आझिम ऊर्फ पल्ला सलीम शेख याचे विरुध्द गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात मागील दिड वर्षापासुन पाहीजे आरोपी होता. तसेच त्याचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, दुखापत, अशा स्वरुपाचे एकुण ०६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

सदरील गुन्हयातील सराईत आरोपी याचा गुन्हा दाखल झाल्यापासुन खडक पोलीस स्टेशन हद्दीत तसेच पुणे शहर व इतर विविध भागात शोध घेत असता पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व ईरफान नदाफ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहीजे असलेला सराईत गुन्हेगार हा कोंढवा भागात त्याचे नाव बदलुन राहत आहे. सदर बातमी मिळताच खडक पोलीस स्टेशन कडील सदर पोलीस अंमलदार यांनी तात्काळ नमुद ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता आरोपी आझिम ऊर्फ पल्ला सलीम शेख, वय २४ वर्षे, रा.५४ एच.पी. लोहियानगर, पुणे. मिळुन आला असता लागलीच ताब्यात घेवून दि.२७/१०/२०२५ रोजी सदरील गुन्हयात अटक केले.

Advertisement

 

सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावल. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. शशिकांत चव्हाण, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती. शर्मिला सुतार, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मनोजकुमार लोंढे, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उप-निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व ईरफान नदाफ यांनी केली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page