लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट.
लोणावळा :
जागतिक कीर्ती असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी नुकतीच भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना “कैवल्यधाम कॉफी टेबल बुक” सप्रेम भेट देऊन सन्मानित केले.
या भेटी दरम्यान योगाद्वारे आरोग्य आणि निरोगीपणा कसा वाढवायचा यावर देखील चर्चा करण्यात आली.
तसेच श्री सुबोध तिवारी यांनी भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविन्द यांची देखील भेट घेऊन त्यांना सुध्दा “कैवल्यधाम कॉफी टेबल बुक” सप्रेम भेट देऊन सन्मानित केले. हे अत्यंत आनंदाचे आणि सन्मानाचे क्षण होते.
कैवल्यधाम संस्थेच्या समृद्ध वारसा आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या “कैवल्यधाम कॉफी टेबल बुक” च्या प्रती सादर करण्याचा मला विशेष सन्मान मिळाला. या पुस्तकाच्या सौन्दर्याबद्दल आणि महत्वाबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केलेली प्रशंशा, हा क्षण अधिकच संस्मरणीय ठरला तसेच माननीय राष्ट्रपतींची भेट हा एक आनंदायी अनुभव होता अशी भावना श्री सुबोध तिवारी यांनी व्यक्त केली