जनहित चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव आयोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळा संपन्न.
तळेगाव दाभाडे :
बुधवार दिनांक 1 मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव येथे जनहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सामुदायिक मंगल परिणय सोहळा 2024 चे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही या सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. यंदा या मंगल परिणय सोहळ्यात तीन जोडप्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उपासक, सुनिल बाबू सोनावणे रा. वाऊंड मावळ याचा उपासिका तेजल पांडुरंग पवार. रा कल्हाट मावळ हिच्याशी मंगल परिणय झाला.2. उपासक प्रवीण उत्तम ओव्हाळ रा. आंदेशी, मुळशी याचा उपासिका माधुरी नामदेव साळवे. रा आढे, मावळ हिच्याशी मंगल परिणय झाला.3 उपासक, गिरीष तुकाराम सोनवणे, रा. भडवली, मावळ याचा उपासिका वैष्णवी दिनेश चव्हाण, रा. आपटी मावळ हिच्याशी मंगल परिणय झाला.
या मंगल परिणय सोहळ्यासाठी विविध सामाजिक संस्था,आणि दान दात्यांनी मदतीचा हात दिला सर्वांनी मदत केली त्यांचे जनहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने मनोभावे सन्मानाने सन्मान देऊन उपकृत केले.जेतवन अर्बन निधी बँक. ली. यांनी ही मदतीचा हात दिला.
या मंगल परिणय सोहळ्याला मावळ, मुळशी तालुका, जिल्हा परिसरातून विविध क्षेत्रातील, अधिकारी, पदाधिकारी, सरपंच ग्रामसेवक. ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, उपस्तिथ होते.तसेच नेते, पुढारी राजकीय पाहुणे, मंडळी यांनीआपली हजेरी लाऊन वधू वरास शुभ आशीर्वाद दिले महिलांनी मोठ्या संख्येने उपस्तिथ होत्या. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव च्या पदाधिकारी Adv रंजना भोसले. तसेच सुरेश धोत्रे माजी नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे. नगरपरिषद. व साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे हे देखील या वेळेस उपस्थित होते.इ. मान्यवर. कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्तिथ होते जनहित चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकारी यांनी गेली कित्येक महिने या सोहळ्यासाठी गावोगावी लोकांशी संपर्क साधून हा सोहळा संपन्न केला सर्वांचे कौतुक होत आहे.