*फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा 2025 संपन्न…*
तळेगाव दाभाडे :
श्रीरंग कलानिकेतन तळेगाव दाभाडे च्या सभागृहात दिनांक 28 जून 2025 रोजी फ्रेंड्स ग्रुपचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न झाला. मैत्रीला जिवापाड जपणारी माणसं या थीमवर आधारित सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….गेली दहा वर्ष हा फ्रेंड्स ग्रुप विविध सामाजिक उपक्रमात सहभागीहोत आहे. तळेगावातील स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिर, गरीब गरजूंना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आर्थिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे, गड किल्ले स्वच्छता मोहीम व ट्रेकिंग, वृक्षारोपण अशा विविध माध्यमातून सतत अग्रभागी असतो.
या ताण-तणावाच्या व्यवस्थापनासाठी कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्याच्या प्रसंगी आमचे सभासद येरवडा मनोरुग्णालयाचे समुपदेशन अधीक्षक डॉ. मोहन बनसोडे यांचे ताण तणावाचे व्यवस्थापन वर व्याख्यान झाले. मैत्रीला जीवापाड जपणारी माणसं या थीमवर आधारित आयोजित कार्यक्रमात लहान मुलांसाठी गमतीशीर खेळ, महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता दहावी व बारावी तसेच विविध विषयातील पदवी व पदविका मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या फ्रेंड्स ग्रुपच्या सभासदाच्या पाल्याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध खेळ व संगीत खुर्ची मधील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आल्या. या शैक्षणिक वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजनात श्री. महादेव भालशंकर, सुहास धस, संदीप कांबळे, नवनाथ आडकर,बजरंग सूर्यवंशी,सुरेश पाटील, हरिश्चंद्र शिवदे, दत्तात्रय जाधव, मनोहर खुणे, शिल्पा पवार व इतर सभासद यांनी मोलाची साथ दिली. सूत्रसंचालन श्री संजय ठाकर, मनोज क्षीरसागर आणि चंद्रकांत उंडे यांनी केले. प्रास्ताविक श्री सहदेव डोंबे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अशोक कराड यांनी केले.