*तळेगाव येथे परिचारीका दिन साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला असून या निमित्त तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ सोमवारी (१२) डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे घरोंदा संस्थेच्या संचालक डॉ. आशा राव आणि विजय राव होते! डॉक्टर भंडारींनी परिचारिकांची कर्तव्य सविस्तरपणे विशद केली. डॉ.आशा यांनी आदर्श परिचारिकेतील गुणां बाबत
संवादातून विद्यार्थिनींना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. प्राचार्य मोनालिसा यांनी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.