आळंदीत इंद्रायणीने सिध्दबेटासह परिसरात काठ सोडला इंद्रायणी नदी पात्रात पाणी सोडल्याने नदीचे पाणी पातळीत वाढ तीर्थक्षेत्रात भक्ती सोपान पूल ; भक्त पुंडलिक मंदिरात पाणी

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी ) :

इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने तसेच खेड, मावळ तालुक्याती धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने खबरदारीचे उपाय योजने अंतर्गत विविध धरणातून पाण्याचा विसर्ग पुढे सोडला जात असल्याने इंद्रायणी नदीचे पाण्याचे पातळीत वाढ झाली आहे. या मुळे आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीचे पाण्यात आणि प्रवाहात वाढ होत आहे. यामुळे इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा गावांतील तसेच शहरातील पाण्याचे पातळीसह नदी प्रवाह वाढला आहे. नदीचे दुतर्फ़ा ये जा करताना दक्षता घेण्याचे सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत. इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने धरण क्षेत्र भागातून पाण्याचा विसर्ग विविध धरणातून दोडण्यात आला आहे. यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहण्यास पाटबंधारे विभागाने दक्षता बाळगण्याचे आवाहन केले. इंद्रायणी नदीने आळंदीत काठ सोडला असून भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले असून नदी लगतचे रस्ते रहदारीस बंद करून ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी नदी लगतच्या रस्त्यांना पर्याय वापरून रहदारी सुरक्षित होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. पुणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी जिल्ह्यातील विविध धरणातुन पाण्याचा विसर्ग पुढे सोडण्यात आला असल्याची माहिती दिली. पाण्याचे विसर्ग नदीत सोडण्यास वाढविण्यात आले आहे. इंद्रायणीचे लाभक्षेत्रा पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. आळंदी येथील भक्ती सोपान पुल पाण्याखाली गेला आहे. भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले आहे. यामुळे श्रींचे दर्शन बंद झाले आहे. नदी लगतचे दगडी घाटावर भागीरथी कुंड देखील पाण्यात गेले आहे. विकसित दगडी घाटावर नदी पात्रालगत पाणी आले असून सिध्दबेटात पाणी घुसले आहे. आळंदीतील बंधाऱ्यावरून पाणी खाली पडत आहे. चौंडी घाटावरील बंधाऱ्यावरून पाणी खाली पडत आहे.

Advertisement

वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रात काल विसर्ग वाढवून २१०३ क्यूसेक्स करण्यात आला होता. पाऊस वाढत असल्याने येवा वाढत आहे. या परिस्थिती मुळे विसर्ग देखील वाढविण्यात आला असल्याचे पुणे पाटबंधारे विभागाने कळविले आहे. नदी लगतचे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात कोणी ही उतरू नये, नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी ( दि. २४ ) सकाळी पाऊणे अकरा वाजता वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रात विसर्ग वाढवून ३ हजार ६२० क्यूसेक्स करण्यात आला. पाऊस चालू / वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थिती नुसार विसर्ग कमी / जास्त करण्यात आला. सायंकाळी चार चे सुमारास वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून ३ हजार ९७७ क्यूसेक्स करण्यात आल्याचे पुणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी सांगितले. कळमोडी धरण येथून सकाळी साडे दहा वाजता कळमोडी धरण ९५ टक्के इतके भरले असल्याने हे धरण “द्वाररहित” Ungated असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीचा पाऊस व धरणात येणारा येवा पाहता पुढील काही तासांत कोणत्याही क्षणी कळमोडी धरण १०० टक्के भरून अनियंत्रित विसर्ग आरळा (भीमा) नदीमधे चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय कासारसाई धरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page