रोटरी क्लब ऑफ हडपसरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
हडपसर :
रोटरी क्लब ऑफ हडपसरच्या 2025-26 वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, रो. संभाजी काकडे यांची अध्यक्षपदी, रो. डॉ. अनुराधा जाधव यांची सचिवपदी आणि रो. अभय बेकनाळकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हा पदग्रहण सोहळा प्रमुख पाहुणे DGN रो. नितीन ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. त्यांनी “Unite for Good” या रोटरीच्या बोधवाक्याचे महत्त्व विषद करत सर्व सभासदांना एकत्र येऊन समाजासाठी भरीव कार्य करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.
मागील वर्षाचे अध्यक्ष रो. किशोर जांभेकर आणि त्यांच्या कार्यसमितीच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करण्यात आली. त्यांनी राबवलेले विविध उपक्रम आणि सेवा प्रकल्प हे क्लबच्या समाजहिताच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
नवीन कार्यकारिणीतील संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ पार पडला त्या मध्ये नवीन संचालक
रो.यशवंत कुलकर्णी -मेंबरशिप
रो.प्रमोद पालीवाल -क्लब ॲडमिनिस्ट्रेशन
रो. अपूर्व शाहू -मेडीकल
रो.नितीन पाटिल -सर्विस प्रोजेक्ट
रो . अजय चौरसिया – युथ डायरेक्टर
रो. नंदू जगताप – पब्लिक रिलेशन
रो. डॉक्टर दत्तात्रय भोसले- इन्व्हरमेंट डायरेक्टर
रो. राजेंद्र कुमार विधाते
रो.शरद साळुंखे क्लब- ट्रेनर
रो अनिल रासकर- डायरेक्टर I.T
रो . धनंजय नसारे – फाउंडेशन
यांना सन्मानित करण्यात आले तसेच
नवीन अध्यक्ष रो. संभाजी काकडे यांनी येणाऱ्या वर्षातील महत्त्वाचे समाजोपयोगी प्रकल्प जाहीर केले, त्यामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश आहे:
1. पर्यावरण संवर्धन प्रकल्प (वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त मोहीम)
2. ग्रामीण व शहरी शाळांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण
3. रक्तदान शिबिरे व आरोग्य तपासणी शिबिरे
4. शाळांमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवणे
5. जलसंधारण व स्वच्छता प्रकल्प
6. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि ई-लर्निंग सुविधा
हा पदग्रहण सोहळा हा रोटरीच्या “सेवा हेच आमचे ध्येय” या तत्त्वाला अनुसरून समाजासाठी काहीतरी भरीव करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार ठरला.