तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई – 28,784 रुपये किंमतीचा गांजा जप्त
तळेगाव एमआयडीसी (पिंपरी चिंचवड):
जांबवडे रोड, इंदोरी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 544.68 ग्रॅम गांजा आणि रोख 1,550 रुपये असा एकूण 28,784 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सलीम हुसेन मुजावर (वय 63) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा रजि. नं. 286/2025, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त)(अ) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
दिनांक 09 डिसेंबर 2025, सायंकाळी 6.50 वाजता तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास पथकाने जांबवडे रोडवरील साहेबराव काशीद यांच्या चाळीसमोर कारवाई केली. आरोपी सलीम मुजावर हा साईनगर, इंदोरी येथे भाड्याने राहत असून त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याची माहिती मिळाली होती.
तपास पथकाने ठिकाणी धाड टाकून आरोपीच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला:
गांजा : 544.68 ग्रॅम
किंमत – 27,234 रुपये
रोख रक्कम : 1,550 रुपये
एकूण किंमत : 28,784 रुपये
गांजा कोठून आणला याबाबत आरोपीकडून विचारणा केली असता तो कोणतीही माहिती देऊ शकला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह.पो.आयुक्त शशीकांत महावरकर, अप्पर पो.आयुक्त सारंग आवाड, पो.उप आयुक्त विशाल गायकवाड आणि सहाय्यक पो.आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील,
पो.उपनिरीक्षक दिपक खरात,
पो.हवा अनंत रावण, वसीम शेख,
पोशि. विनायक शेरमाळे, भिमराव खिलारे,
गणेश दरदळे व रमेश घुले
यांनी सहभाग घेतला.






