इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचे नवलाख उंब्रे येथे उद्धाटन 

SHARE NOW

नवलाख उंब्रे:

 

मावळ तालुका नवलाख उंब्रे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी राष्ट्रीय सेवा योजना स्तर दोन शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांच्या हस्ते दि.९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाले.

राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी विशेष शिबिरासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे खजिनदार निरूपा कानिटकर तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्घाटन प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले, श्रीराम विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भाऊ शेटे श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक विनय गायकवाड राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.वीणा भेगडे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.केशव जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ५० शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

शिबिर उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.मलघे यांनी सांगितले की ” राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करते.श्रम भावना निर्माण करून लोकशाही मूल्यांची जोपासना करणे. स्वच्छता शिक्षण आरोग्य करत भावी पिढी घडविण्यासाठी आपल्या राष्ट्रा बद्दल देशप्रेम तसेच ग्रामीण विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य महत्वाचे ठरते.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.

 

तसेच याप्रसंगी सुरेश भाऊ शेटे, उपप्राचार्य संदीप भोसले मुख्याध्यापक विनय गायकवाड यानी विद्यार्थ्यांना या हिवाळी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. ‎

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विजय खेडकर यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका वीणा भेगडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका प्रतिभा खाडप यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरख काकडे यांनी विशेष सहकार्य केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page