माळवाडीमध्ये विदेशी दारूचा साठा जप्त; 20 वर्षीय युवकाला तळेगाव MIDC पोलिसांची धरपकड
तळेगाव दाभाडे :
मौजे माळवाडी गाव हद्दीत तळेगाव–चाकण रोडवरील हॉटेल साईराजच्या आडोशाला बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा ठेवून वाहतूक करणाऱ्या इसमाला तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ₹10,515 किंमतीचा विदेशी दारूचा प्रोव्हीबीशन माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा रजिस्टर नं. 287/2025, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(E) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी: रमेश सोमिनाथ घुले (वय 27, पो.शि. ब.नं. 3584)
आरोपी: सार्थक सतिष दाभाडे (वय 20, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ)
दि. 10/12/2025 रोजी दुपारी 13:35 वा. सुमारास माळवाडी येथे आरोपीकडून खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू आढळली:
ओल्ड मंक – 07 बाटल्या
डब्री स्पेशल डिलक्स – 03 बाटल्या
व्हुलन ब्लू व्हिस्की – 04 बाटल्या
किंगफिशर स्ट्रॉंग – 08 बाटल्या
बडवायझर मॅग्नम – 04 बाटल्या
बडवायझर प्रीमियम – 02 बाटल्या
क्लासबर्ग – 07 बाटल्या
ट्युबर्ग – 16 बाटल्या
एकूण मिळून ₹10,515 किंमतीचा विदेशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची नोंद संबंधित न्यायालयास पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पो.आयुक्त शशीकांत महावरकर, अप्पर पो.आयुक्त सारंग आवाड, पो.उपआयुक्त विशाल गायकवाड, सहा. पो.आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथक:
वरिष्ठ पो.नि. संतोष पाटील, पो.उपनिरीक्षक दीपक खरात, पोहवा अनंत रावण, वसीम शेख, पोशि भिमराव खिलारे, गणेश दरदंले व फिर्यादी रमेश घुले यांनी ही कारवाई केली.






