*सेलू, उमरगा, कणकवली, पिंपरी – चिंचवड, खामगाव, बुटीबोरी, शहादा, आणि चिपळूण तालुका संघ ठरले पुरस्काराचे मानकरी* *आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा*.. *अकोला जिल्हा पत्रकार संघाचाही होणार सन्मान* *1 फेब्रुवारी रोजी सेलू येथे पुरस्कार वितरण सोहळा*

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे आणि रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने देण्यात येणारया अनुक्रमे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची एस.एम.देशमुख यांनी आज येथे घोषणा केली आहे.. अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2024 चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..

पुरस्कारासाठी विविध तालुका, जिल्हा संघांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.. त्यातून खालील तालुका संघांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे..

 

*1) संभाजीनगर विभाग*

सेलू तालुका मराठी पत्रकार संघ, सेलू जिल्हा परभणी

*2) लातूर विभाग* : उमरगा तालुका पत्रकार संघ, जिल्हा लातूर

*3) कोल्हापूर विभाग* : कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग

*4) पुणे विभाग* : पिंपरी – चिंचवड तालुका पत्रकार संघ, जिल्हा पुणे

*5) अमरावती विभाग* : खामगाव प्रेस क्लब (संलग्न मराठी पत्रकार परिषद) जि. बुलढाणा

*6) नागपूर विभाग* : बुटीबोरी तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर

*7) नाशिक विभाग* : शहादा तालुका पत्रकार संघ जिल्हा नंदुरबार

*8) कोकण विभाग* : चिपळूण तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी..आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कारासाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाची निवड करण्यात आली असल्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आलं आहे..

Advertisement

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत असतात, त्याचबरोबर पत्रकारांचे हक्क आणि माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी देखील ते कायम सतर्क असतात.. अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्य पातळीवर पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेने 12 वर्षांपासून सुरू केलेला आहे.. पुरस्कार वितरणाचे हे सोहळे जाणीवपूर्वक राज्याच्या विविध भागात घेतले जातात.. त्यानुसार नागपूर, पाटण,कर्जत अक्कलकोट, गंगाखेड, पालघर, वडवणी, माहूर आदि ठिकाणी यापुर्वी हे कार्यक्रम पार पडलेले आहेत.. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे..

पुरस्कार विजेत्या सर्व तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे…

सर्व पुरस्कार विजेत्या संघांनी पुरस्कार वितरण सोहळयास आपल्या सर्व सदस्यांसह उपस्थित राहून आपला पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.. तालुका अध्यक्ष आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकारयांनी देखील कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page