*नवीन समर्थ विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठया उत्साहात संपन्न*

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे होते.

संमेलनाचे ध्वजारोहण माजी विद्यार्थी, उद्योजक दिगंबर राक्षे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकमान्य टिळक, गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर, आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वंदन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संचालक शंकरराव नारखेडे यांच्या हस्ते झाले. कलादालनाचे मिलिंद शेलार, रांगोळी दालनाचे किरण ओसवाल, तर विज्ञान दालनाचे उदघाटन सुहास ढमाले यांच्या हस्ते झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून स्वतःची उंची वाढवावी व आपल्या शाळेचे नाव समाजात विशिष्ट उंचीपर्यंत न्यावे असे सांगितले. या कार्यक्रमा दरम्यान मिलिंद शेलार ,किरण ओसवाल,सुहास ढमाले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निरांजन या हस्तलिखिताचे प्रकाशन संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी सांगितले की दहावी आणि बारावीची उत्कृष्ठ निकालाची परंपरा यापुढेही कायम रहावी. प्रमुख वक्ते प्राध्यापक विजयराव नवले यांनी विद्यार्थ्यांना कलात्मकता जोपासण्याचा तसेच चेहऱ्यावर आनंद ठेवून संयमित जीवन जगण्याचा मार्ग याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा,प्रगती विद्यामंदिर इंदोरीचे प्राचार्य रेवप्पा शितोळे छत्रपती शिवाजी विद्यामंदिर कान्हेचे प्राचार्य कैलास पारधी सर, पैसा फंड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका अनिता लादे ,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे,विनायक अभ्यंकर ,दामोदर शिंदे,मुख्याध्यापिका वासंती काळोखे,पर्यवेक्षक शरद जांभळे,इरावती केतकर,आदी मान्यवर उपस्थित होते.नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन समर्थ विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

Advertisement

शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी प्रास्ताविक केले तर  पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब पवार तसेच मीरा शेलार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख अनुराधा हुलावळे, जयश्री बोंडखळ, शिक्षकेतर प्रतिनिधी राहुल गाडे कॉलेज विभाग प्रमुख स्वप्नाली दाभाडे शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील, संजय कसाबी आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांंनी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page