प्रजासत्ताक दिनी तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा दीपप्रज्वलन व शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे:
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘लाइटिंग द लॅम्प’च्या माध्यमातून अत्यंत पवित्र, प्रसन्न व प्रेरणादायी शपथविधी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभास श्रीमंत राजमाता वृषालीराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे सरकार, संस्थेचे चेअरमन श्री. शैलेशभाई शहा, विद्यमान अध्यक्ष श्री. गणेशजी खांडगे, नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ. शालिग्राम भंडारी, संस्थेतील पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवर्ग, घरोंदा संस्थेच्या आशा विजय राव, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष श्री. गणेशजी खांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत रुग्णसेवेत अपेक्षित असलेल्या संवेदनशीलतेची, कर्तव्यनिष्ठेची व मानवतेची जाणीव करून दिली. प्रमुख पाहुण्या श्रीमंत राजमाता वृषालीराजे व चेअरमन श्री. शैलेशभाई शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री डॉ. शालिग्राम भंडारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना,
“अप्प दीपो भव – स्वतः दीप बनून दुःखित व पीडितांचे दुःख दूर करण्यासाठी प्रेमाची ज्योत सदैव तेवत ठेवा,” असा हृदयस्पर्शी संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य मोनालिसा मॅडम, शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे हा परिचारिका सेवा-व्रती शपथविधी समारंभ अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.






