*जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा*
तळेगाव दाभाडे येथील जनसेवा जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यांचे अध्यक्षते खाली साजरा झाला. तळेगाव येथे रविवारी(दि.२९)उत्साहात साजरा झाला.यावेळी अध्यक्ष शशिकांत खरात,उपाध्यक्ष चंद्रसेन बनसोडे,सचिव नारायण निघोजकर,सदस्य शिवाजी शिर्के,लक्ष्मण दिघे,सुभाष कदम,रोहीदास थोरवे आदी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक रोहीत लांघे,सुनील कारंडे,निलेश पारगे उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांसह भरत दहितुले,किसन देशमुख,लक्ष्मण जोशी,अरुण भुते,सोपान अल्हाट आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.मनोगतामध्ये जनसेवा जेष्ठ नागरिक संघासाठी जागा मिळविणेसाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.जगन्नाथ काळे यांनी जेष्ठ नागरिकांच्या अडीआडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्या बाबत मार्गदर्शन केले.