*कन्या शाळा क्रमांक चार मध्ये योग दिन उत्साहात साजरा*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार तळेगाव दाभाडे मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त 21/ 6 /2024 रोजी नगर परिषद शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी शिल्पा  रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Advertisement

 

त्यामध्ये विविध प्रकारची योगासने ,सूर्यनमस्कार ,संगीत हालचाली विद्यार्थ्यांच्या करून घेण्यात आल्या.निकिता शितोळे व बेबी जाधव यांनी विद्यार्थिनींना योगदिनाचे,व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले.सेवानिवृत्त शिक्षिका चेतना असर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता तिकोने ,वैशाली साबळे ,आशा गायकवाड, विक्रांती गरड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page