श्री डोळसनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शरद भोंगाडे यांची निवड
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक शरद भोंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 26 डिसेंबर 2024 रोजी निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, संतोष भेगडे, उपाध्यक्ष समीर भेगडे, खजिनदार अमित भसे, सचिव अतुल राऊत, सल्लागार बबनराव भोंगाडे, ज्येष्ठ संचालक अंकुश आंबेकर, राहुल पारगे, आशिष खांडगे, अरविंद गद्रे आदी उपस्थित होते.
बबनराव भेगडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संतोष भेगडे यांनी संस्था राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली राहुल पारगे यांनी सूत्रसंचालन केले, अंकुश आंबेकर यांनी आभार मानले.