महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन गोविंद ठाकर यांची निवड
मावळ:

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे,राज सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य समन्वयक नितिन शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार हल्ला कृती समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन चपळगावकर राज्य सहसंपर्कप्रमुख पराग कुकुळवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा तर मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन गोविंद ठाकर वडगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश गाडे कृती हल्ला मावळ तालुका अध्यक्षपदी संजय दंडेल यांची निवड करण्यात आली.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की पत्रकारांच्या समस्येवर आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुसज्ज असे पत्रकार भवन आगामी काळात वीस गुंठ्यामध्ये उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी
सर्व पत्रकारांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील २५ हजारांपेक्षा जास्त पत्रकार हे संघटनेशी जोडले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पत्रकार संघाचे काम सुरू असून भविष्यात संघटनेतील प्रत्येक पत्रकारांना आरोग्य व शासनाच्या सोईसुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे.तसेच संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.
विजय सुराणा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व पत्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे पत्रकार संघाचे अधिवेशन आगामी काळात मावळ तालुक्यात भरविले जाईल अशी ग्वाही दिली.
तसेच सचिन ठाकर यांनी सांगितले की मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना एकत्रित करून अडीअडचणी सोडविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुशिल सैदाने
राजेंद्र काळोखे तसेच महादेव वाघमारे धनंजय नांगरे,विशाल कुभांर, दिलीप कांबळे,योगेश घोडके, अभिषेक बोडके, निलेश ठाकर, सुभाष भांडे, सचिन सोनवणे, सुनिल आढाव, सचिन मोरे, आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद सदांण आभार अतुल क्षिरसागर यांनी व्यक्त केले.






