इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती विचार प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी
तळेगाव दाभाडे दि.२४.:
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२५ रोजी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विषयाचे तज्ज्ञ अभ्यासक प्रा.आर.आर.डोके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ” देशाच्या स्वातंत्र्या मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले होते.ब्रिटिश साम्राज्याचा अस्त निर्माण करण्यात व देशाच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक प्रगतीमध्ये त्याकाळी टिळकांची भूमिका महत्त्वाची मानली गेली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचा चतु:सूत्री कार्यक्रमाची माहिती देण्यात आली १९०५ यावर्षी टिळकांनी वंग-भंग चळवळीला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. त्यासाठी त्यांनी चतु:सूत्री जाहीर केली.
त्यानुसार स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चार सूत्रे जाहीर केली. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला. स्वदेशी वस्तूंचा वापर प्रत्येकाने करावा असा आग्रह टिळकांनी त्यावेळी धरला होता. त्यावेळी प्रत्यक्षपणे ही आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात होती.
तळेगाव या ठिकाणी नूतन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना तसेच पैसा फंड काच कारखान्याची सुरुवात करून भारतीय रेल्वेला त्याकाळी लागणारी काच या पैसा फंड काच कारखान्यातून पुरविण्यात येत असल्याचे सांगितले जात असल्याचे विश्लेषण केले.लोकमान्य टिळक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मैत्री पूर्व संबंध देखील यावेळी विश्लेषण आले.
याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी विनम्र अभिवादन केले उपप्राचार्य प्रा.संदिप भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रा.वृषाली मांडेकर यांनी केले.यावेळी सांस्कृतिक विभागाच्या प्रा. हर्षदा पाटील विज्ञान विभागाचे प्रा.शिवाजी जगताप तसेच प्रा.सविता चौधरी प्रा.योगेश घोडके प्रा.तेजस दिवसे आदी शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.






