“परांजपे विद्यामंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा”

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

१५ ऑगस्ट २०२५ रोजी अॅड्. पु. वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात शालेय समिती सदस्य अशोक काळोखे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तुषार भेगडे, चेतन भेगडे, डॉ. अशोक दाते, श्रीकांत दाभाडे, नितीन दाभाडे अनेक माजी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांच्या तालावर कवायत व योग प्रात्यक्षिकांचे सामुदायिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

माजी विद्यार्थी तुषार भेगडे, डॉ. अशोक दाते, श्रीकांत दाभाडे, संदीप भेगडे, चेतन भेगडे यांनी मनोगते व्यक्त केली.

Advertisement

आपल्या मनोगतात अशोक काळोखे म्हणाले की, “शाळांमध्ये भारताचे भविष्य आकार घेत आहे. योग, अध्यात्म, शिक्षण व तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील.” त्यांनी विद्यालयात सुरू असलेल्या गुरुकुल पद्धतीचे कौतुक करून हा उपक्रम मुलांना जीवनमूल्यांची ओळख करून देणारा असल्याचे सांगितले.

मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमच्या विद्यालयाचा मूलभूत हेतू आहे. पुस्तकी ज्ञानासोबत मैदानी खेळ, कौशल्य विकास, योग, मेडिटेशन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे उपक्रम विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवतात. पालकांचा व समाजाचा या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुवर्णा काळडोके, आभार प्रदर्शन सौ. रेखा भेगडे, तर सूत्रसंचालन सौ. प्रभा काळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page