अनुसया शेंडगे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कामशेत:
मावळ तालुक्यातील सांगिसे /बुधवडी/ वेलवळी ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच अनुसया तुकाराम शेंडगे यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट. कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार दिनांक २०जुलै २०२५ रोजी पुणे येथील गंजपेठेत असणाऱ्या सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात अनुसया शेंडगे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर. आयकर विभाग पुणे आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे.. सुनील शेंडगे. नथुराम डोईफोडे. बाबुराव शेंडगे यांनी संयोजन म्हणून काम पाहिले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नवी दिल्ली श्री बाळासाहेब झोरे .अध्यक्ष मुळशी श्री भाऊसाहेब आखाडे. राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष मुळशी श्री संतोष झोरे सरपंच. श्री दिनेश शिंदे सरपंच भोर श्री बाळासाहेब मरगळे सरपंच .ताईबाई दत्ता आखाडे सरपंच रूपाली संतोष खरात उपसरपंच श्री अंकुश गोरे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर युवा प्रतिष्ठान माले मुळशी सचिव श्री पप्पू तुकाराम शेडगे संस्थापक अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान सांगीसे मावळ अनिल आखाडे सनी खरात ज्ञानेश्वर मरगळे श्री तुकाराम दादा कोकरे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख ऑल इंडिया धनगर समाज संतोष पांढरे महावीर काळे नवल राज काळे कोकण विभाग अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज बहुजनांचे नेते राम जानकर विकास जानकर कामगार नेते कार्यक्रमाचे संयोजन समिती श्री सुनील शेंडगे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज श्री नथुराम डोईफोडे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज श्री बाबुराव तुकाराम शेडगे मावळ तालुका अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .या संदर्भात बोलताना अनुसया शेंडगे म्हणाल्या की पुढील कार्यासाठी हा पुरस्कार मला नेहमीच प्रेरणादायी ठरेल. आदर्श माता पुरस्कार प्राप्त झाल्याने अनुसया शेंडगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






