उर्से येथे सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डि) ड्रग्स जप्त,एका तरुणाला पोलिसांनी केली अटक
उर्से :
मावळ तालुक्यातील उर्से गावच्या हद्दीत असणाऱ्या फिनोलेक्स केबल कंपनीच्या समोर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी कारवाई करत समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा. मावळ) या तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील ११.७५० ग्रॅम मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली पदार्थ जप्त केला.या अमली पदार्थाची किंमत १ लाख १७ हजार ५०० रुपये असून याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिकोणे याला उर्से गावच्या हद्दीतील फिनोलेक्स कंपनीच्या समोर उर्से ब्रिजजवळ १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ११.७५० ग्रॅम मेफेड्रॉन विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीने हा अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ताब्यात ठेवला होता. त्याच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.मेफेड्राॅन हे ड्रग्स अतिशय घातक असते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.






