जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान दिव्यांग महिलांचा सन्मान.
तळेगाव दाभाडे:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल मावळ तालुका यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून दिव्यांग कर्तृत्ववान महिलांचा गाथा सन्मानाची मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांन मध्ये कुलस्वामिनी महिला मंच च्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ. सारिकाताई शेळके, दिव्यांग सेल प्रदेशाध्यक्षा मा. सौ. नीताताई ढवाण, पुणे जिल्हाध्यक्षा मा.सौ. पुष्पाताई गोसावी, मावळ तालुका सहा.गटविकास अधिकारी मा.श्री. एस. एस.थोरात, जिल्हा उपाध्यक्षा मा. सौ.सुवर्णाताई राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष दिव्यांग सेल श्री. गणेश शेडगे, जिल्हा सरचिटणीस मा.सौ. उज्वलाताई जाधव, पवन मावळ उपाध्यक्ष सौ. सुनीता कालेकर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्षा मा.सौ. ज्योतीताई राजीवडे यांनी केली प्रस्तावनेच्या भाषणातून जागतिक महिला दिनानिमित्त ज्या दिव्यांग महिला भगिनींचा सन्मान करत आहोत त्या खूप कौतुकास्पद समाजामध्ये कार्य करत आहे म्हणून अशा दिव्यांग भगिनींचा स्मृतिचिन्ह, देऊन सन्मान करण्यात खूप आनंद होत आहे.
कुलस्वामिनी महिला मंच संस्थापिका अध्यक्षा मा.सौ. सारिकाताई शेळके यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग भगिनींच्या कुठल्याही प्रकारची अडीअडचण आल्यास मी स्वतः व मावळचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील आण्णा शेळके तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा शब्द दिला.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा दिव्यांग सेल मा.सौ. नीताताई ढवाण यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधवांना जे काही अडचण येते त्या सोडवण्याचा शब्द दिला.
पुणे जिल्हाध्यक्षा दिव्यांग सेल मा.सौ. पुष्पाताई गोसावी यांनी दिव्यांग बांधवांना कुठले प्रकारच्या अडचणी आल्यास त्या सोडवण्याचे पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सत्कारमूर्ती राष्ट्रीय जलतरणपटू कु.गीतांजली ढोबे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. भाग्यश्री मोरे, आरोग्य सेविका अलकाताई नाईकवाडे, आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा संस्थापिका मयुरीताई बोत्रे, आरोग्य सेविका सौ. सुलोचनाताई गाडे यांचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण शेलार सर यांनी केले श्री. भरत नाना राजीवडे, वैशाली लगाडे, मनीषा यादव, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सौ.सायनिका सावंत यांनी मानले व भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली