महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मदन बाफना एक आदर्श व्यक्तिमत्व – बाळा भेगडे
मावळ :
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदन बाफना यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मदन बाफना आमच्यासाठी आदर्श आहेत असे असे गौरवोद्गार माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी काढले. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदन बाफना यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून वडगाव मावळ येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळा भेगडे हे होते. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता पडवळ, महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णाजी कारके, पोटोबा महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, माजी नगरसेवक किशोर भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,
ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, नंदकुमार कोतुळकर, बारकू ढोरे, नंदू धनवे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, संचालक प्रल्हाद जांभुळकर, दत्तात्रय असवले, किसन कदम, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल राऊत, विशाल वहिले, सुनील नाना भोंगाडे, प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे, अशोक गायकवाड, हिरामण लंघे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व मावळ तालुक्यातील कार्यकर्ते, संस्थेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मदनजी बाफना संस्थापक असलेल्या श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बाफना साहेबांचा वाढदिवस ‘प्रेरणादिन’ म्हणून साजरा करण्यात आला व पुणे पीपल्स को ऑफ बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, सहकार भूषण बबनराव भेगडे या दोन्ही मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाळा भेगडे पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मावळ तालुक्यातील समाजकारणाला दिशा देण्याचे काम संपूर्ण आयुष्यात बाफना साहेबांनी केले. अत्यंत स्पष्ट भूमिका आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व हे बाफना साहेबांच विशेष गुण आहे असे ते म्हणाले.
तसेच आमचे मार्गदर्शक बबनराव भेगडे हे सहकार, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्व असून आपला सहकारातील अनुभव उत्तम आहे. पुढील येणाऱ्या काळात सहकाराची दिशा आणि सहकाराचा मार्ग कशा पद्धतीने गतिमान करता येऊ शकेल याच अपेक्षेने आम्ही तरुण वर्ग आजच्या कार्यक्रमाचे निमित्ताने आपल्याकडून करतील आपले मार्गदर्शन अशाच पद्धतीने मिळत राहो आणि या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून शुभेच्छा देतो.
सत्काराला उत्तर देताना बाफना साहेब म्हणाले की, ८५ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप माणसे कमावली व गमावली आणि या ८५ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत तुम्ही जनतेने दिलेले भरभरून मोठे प्रेम आणि साथ आणि माझ्या कुटुंबातील घटकांनी दिलेली मोठी साथ हेच होय.प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा ठेवा असल्याचे बाफना साहेबांनी सांगितले.
बबनराव भेगडे म्हणाले की, बाफना साहेबांचे व्यक्तिमत्व आमच्यासाठी आयुष्यभर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहिले आहे. दरवर्षी माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातो त्याबद्दल बबनराव भेगडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
बापूसाहेब भेगडे,भास्करराव म्हाळसकर, गणेश भेगडे, दत्तात्रय पडवळ, प्रभाकर ओव्हाळ यांनी बाफना साहेबांना व बबनराव भेगडे यांना वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र डोके, डॉ शितल देवळालकर, डॉ शितल दुर्गाडे यांनी केले. प्राचार्य अनिता धायगुडे यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य अशोक गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.