महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागणी याकडे दुर्लक्ष होत आहे त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्याचा इशारा.
तळेगाव दाभाडे:
मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचप्रमाणे 29 ऑगस्ट 2024 पासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्यात येईल या संबंधित पूर्व सूचना देणारे निवेदन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना देण्यात आले. यावेळेस उपमुख्याधिकारी ममता राठोड लेखापाल नरेंद्र कणसे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, संगणक अभियंता सोनाली सासवडे, सहाय्यक मिळकत पर्यवेक्षक जयंत मदने त्याचप्रमाणे आस्थापना विभाग प्रमुख मनिषा चव्हाण यावेळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्यसंवर्गातील जवळपास 3000 अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील 60000 च्या वर कर्मचारी वर्ग यांच्यात असंतोष आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत. संघटनेचे विशेष सभा 14 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या निर्णयानुसार संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्या यावर दिनांक 28 ऑगस्ट 2024 पर्यंत अस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनांमार्फत जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्याकरिता दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला आहे.