*पाणी साचत असल्यामुळे बेमुदत पाण्यात उभे राहण्याचे आंदोलन*
तळेगाव दाभाडे स्टेशन मागात नगरपरिषद हद्दीत पैसाफंड काच कारखाना आणि मयुरेश हॉटेल समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट रस्ता रुंदीच्या कामामुळे पावसाचे आणि गटाराचे पाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात साचत असल्यामुळे रहीवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच वाहन चालकांना धोकादायक झाले असुन जिवीतहानी होत आहे
याबाबत माजी उपनगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते गिरीष खेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन वर्षापासुन अनेक वेळा लेखी तोंडी विनंत्या केल्या असुन अर्ज,निवेदने दिली आहेत.परंतु याबाबत कायम स्वरुपी दखल संबंधित प्रशासनाने घेतली नसल्यामुळे याबाबत कायम स्वरुपी उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गिरीष खेर सोमवारी(दि.१९) सकाळी १०वा.पासुन बेमुदत पाण्यात उभे राहणार आहेत.असे पत्र त्यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांना गुरुवारी(दि.०८)दिले आहे.त्याची प्रत मुख्याधिकारी नगरपरिषद तळेगाव दाभाडे,पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे,वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक तळेगाव दाभाडे,कार्यकारी अभियंता/अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना देण्यात आली आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित सचिव आणि राज्य मंत्र्यांना देण्यात आलेली आहे.