*तळेगाव स्टेशन भागात ध्वजारोहण उत्साहात संपन्न*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण उत्साहात साजरा झाला.सरस्वती विद्यामंदिर मध्ये अध्यक्ष सुरेश झेंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स्काऊट गाईड राज्य आयुक्त अरुण सपकाळे,सुचित्रा चौधरी,विश्वास देशपांडे,प्रमोद चोळकर,रेखा परदेशी,नवनाथ गाढवे,सोनाली काशीद शिक्षक,शिक्षेतर कर्मचारी,विद्यार्थी पालक उपस्थित होते.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आंबेडकर निवासस्थानाचे प्रांगणात पोलीस निरीक्षक संजय घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी किसन थुल,एल.डी.कांबळे,भास्कर गजभे,विजयभान बौध्द,संजय गायकवाड,संतोष मेश्राम उपस्थित होते.वीज उपकेंद्राच्या प्रांगणात उपकार्यकारी अभियंता राजेंद्र टेकाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी उपकार्यकारी अभियंता भूषण पाटील,सहाय्यक अभियंता जाधव,विजय कांबळे वीज महापारेषण आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.स्वराज नगरी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सीआरपीएफ चे सबइन्सपेक्टर माधव वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत,उपाध्यक्ष भगवान मोरे,सचिव अशोक जाधव,सामाजिक कार्यकर्त्या सानिका सावंत,भाग्यश्री खर्चे,शकुंतला कदम, वंदनाखटावकर उपस्थित होते.यावेळी सफाई कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.