श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे घडली दुर्घटना
शेलारवाडी:
श्री क्षेत्र घोरावडेश्वर येथे शिवमंदिरासमोर एक मोठा दगड कोसळून अपघात झाला. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला तात्काळ डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी येथे दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
दगड कोसळल्यामुळे मंदिरासमोरील बॅरिगेटिंग तसेच मंदिराला वीजपुरवठा करणारी केबल यांचे नुकसान झाले असून कालपासून मंदिर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
Advertisement
आज देवस्थानाचे मुख्य महंत योगी अमरनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली बॅरिगेटिंगची दुरुस्ती करण्यात आली तसेच इलेक्ट्रीशियनच्या मदतीने पोल ते मंदिर अशी संपूर्ण लाईन तपासून वायरिंगचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे लवकरच मंदिर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.






