कैवल्याधाम योग संस्था लोणावळा येथील कैवल्य विद्या निकेतन शाळेत शिशुवर्गाचा विधीपूर्वक भूमिपूजन समारंभ तसेच पालकांसाठी “स्वागत कक्ष” उदघाटन समारंभ संपन्न.
लोणावळा :
सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी कैवल्यधाम योग संस्था, लोणावळा येथील कैवल्य विद्या निकेतन शाळेत शिशुवर्गाचा विधीपूर्वक भूमिपूजन समारंभ तसेच पालकांसाठी “स्वागत कक्ष” उद्घाटन समारंभ श्री व सौ. राजकुमार सक्सेरिया, कैवल्यधाम संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश तिवारी, संस्थेचे सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी, कैवल्य विद्या निकेतन शाळेचे संचालक डॉ.एन.डी. जोशी, प्राचार्या सौ. भारती कावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी, श्री आशिष बुटाला, श्री नवीन भुरट, लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती तसेच कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, कैवल्य विद्या निकेतन शाळेचा शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कैवल्यधाम संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामी कुवलयानंद जी यांचे कैवल्यधाम संस्थेत पूर्व प्राथमिक शाळा असावी असे स्वप्न होते. ते आज साकार झाले आहे.
पांगोळी, लोणावळा येथील डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या कैवल्य विद्या निकेतन शाळेत नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंत शालेय शिक्षण देले जाते. 21 डिसेंबर 2024 रोजी नुकताच शाळेने आपला “वार्षिक दिन उत्सव” मोठ्या उत्साहात साजरा केला.
सर्व सुविधांनी सुसज्ज असलेला शिशुवर्ग बांधकाम पूर्ण झाल्यावर येणाऱ्या वर्षात सुरु होणार आहे याचा निश्चितच लोणावळा तसेच ग्रामीण परिसरातील मुलांना लाभ होणार आहे.