दापोडी येथील विनियार्ड वर्कर्स चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त विविध कार्यक्रम
पिंपरी:
नवीन वर्षांच्या आगमनाची व डिसेंबर महिन्यातील शेवटच्या सप्ताहात येणाऱ्या नाताळ सणाची लगबग दापोडी येथील विनियार्ड वर्कर्स चर्चमध्ये सुरू आहे. ‘विनियार्ड वर्कर्स’ चर्चचा परिसर प्रकाशमय झालेला असून, प्रार्थना आणि कॅरोल्सच्या सूरांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे.
या तयारीविषयी चर्चचे संस्थापक बिशप पीटर सिलवे आणि पास्टर जयश्री सिलवे यांनी माहिती देताना सांगितले, की नाताळच्या पूर्व संध्येला २४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते मध्यरात्री १२, तसेच ख्रिस्त जन्मोत्सव २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ आणि मध्यरात्रीची प्रार्थना ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १२, तर नव-वर्षाची प्रार्थना सभा १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत होणार असून, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी वीस हजार पेक्षा अधिक लोक या विशेष कार्यक्रमांत उपस्थित राहतात. हा कार्यक्रम डिसेंबर महिन्यातील एक खास आकर्षण आहे.
चर्चचे संस्थापक बिशप पीटर सिलवे आणि पास्टर जयश्री सिलवे यांनी या निमित्त सर्वांना नाताळच्या मूळ उद्देशाची आठवण करून देत “विनियार्ड वर्कर्स चर्चमधील नाताळ केवळ एक सण नाही, तर येशू ख्रिस्ताच्या जन्माचा अर्थ समजून घेण्याची एक संधी असल्याचे सांगितले. प्रेम, क्षमा आणि नव्या सुरुवातींचा संदेश मानवजातीसाठी आजही तितकाच प्रभावशाली आहे, जितका तो दोन हजार वर्षांपूर्वी होता.