विभागीय वेट लिफ्टिंग सपर्धेसाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची निवड
तळेगाव दाभाडे :- राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय येथे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेतून विभागीय स्पर्धेसाठी इंद्रायणी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ५५ किलो वजनी गटामध्ये कला शाखेतील ओम सूर्यवंशी, तर बीबीए (सीए) विभागाचा अनिकेत सूर्यवंशी याची ७३ किलो वजनी गटातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून निवड झालेले विद्यार्थी हे अमृतेश्वर कला व वाणिज्य महाविद्यालय (विंझर) येथे दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धांसाठी खेळणार असल्याची माहिती इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. अशपाक मुलाणी यांनी दिली. सरावातील सातत्य व योग्य आहार याच्या पूर्व नियोजनातून विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच गोरख काकडे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.