नवोगतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ*
तळेगाव दाभाडे :
सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभाग तळेगाव दाभाडे येथे सोमवार दिनांक १६ / ६ /२०२५रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. मोठ्या गटातून इयत्ता पहिली मध्ये विद्यार्थी आले या विद्यार्थ्यांचे स्वागत सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभागात करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुरेश झेंड, सदस्य श्री. विश्वास देशपांडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे सर ,सहशिक्षिका सौ.आशा गायकवाड व कु.अस्मिता ढावरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पेढा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक विभागात इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले
सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. सुरेश झेंड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच उपाध्यक्ष श्री.दिलीप कुलकर्णी ,कार्यवाह श्री.प्रमोद देशक, शिक्षण समिती सदस्या डॉ.सौ.ज्योतीताई चोळकर, श्री.विश्वास देशपांडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अशाप्रकारे अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण केले.