देहूतील लक्ष्मी होम्स सोसायटीत ‘महिला शक्ती’चा ऐतिहासिक विजय — संपूर्ण कमिटी महिलांच्या हाती!
देहू :
श्री क्षेत्र देहू येथील परंडवाल सिटी मधील लक्ष्मी होम हाउसिंग सोसायटीमध्ये महिलांना संधी देत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोसायटीच्या संपूर्ण कारभाराची धुरा आता महिला भगिनींकडे सोपवण्यात आली आहे.
शिल्पाताई योगेश परंडवाल (अध्यक्ष, सौ. लताताई महिला विकास फाउंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सोसायटीतील सर्व बंधू-भगिनींनी एकमताने महिलांना नेतृत्वाची संधी देत समाजात एक सकारात्मक संदेश दिला.
नवीन निवड झालेली कमिटी पुढीलप्रमाणे आहे —
अध्यक्षपदी सौ. स्वरांजलीताई मांढरे, सेक्रेटरीपदी सौ. शितलताई कदम, तर खजिनदारपदी सौ. प्राजक्ताताई गोलगिरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून सौ. रूपाली अविनाश गंधास, सौ. श्वेता अविनाश आवळे, सौ. सुवर्णा प्रमोद अस्वार, सौ. रूपाली शंकर तावडे, सौ. पल्लवी सुजित भोसले, सौ. सना समीर पटेल, सौ. जयश्री अशोक सुपे, सौ. चंचल पुष्पक पाटील, सौ. स्मिता अमोल पाटील आणि सौ. मयुरी पांडुरंग काशीद यांचा समावेश आहे.
या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार योगेश दादा परंडवाल (नगरसेवक, देहू नगरपंचायत) तसेच लक्ष्मी होम्स सोसायटीतील सर्व रहिवाशांनी उत्साहात केला.
या उपक्रमामुळे महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळत असून, समाजात महिला सक्षमीकरणाचा एक आदर्श निर्माण झाला आहे.






