शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी नक्षत्रा मनोहर सोनवणे हिची निवड
तळेगाव दाभाडे :
पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे झालेल्या शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी नक्षत्रा मनोहर सोनवणे 11 वी सायन्स हिने विशेष प्राविण्य मिळवले .त्याचप्रमाणे 23 ते 26 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे होणाऱ्या.शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे साहेब,संस्थेचे कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे साहेब प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर,उपप्राचार्य श्री संदीप भोसले सर,श्री गोरख काकडे सर,सायन्स विभाग प्रमुख खाडप सर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रतिभा गाडेकर सर्वांनी तिचं कौतुक व अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.