माईर्स भौतिकोपचार महाविद्यालयात सहावी राष्ट्रीय वार्षिक कायनेसिओकॉन २०२५ परिषद संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:- माईर्स एमआयटीच्या भौतिकोपचार महाविद्यालयात १९ आणि २० सप्टेंबर २०२५ रोजी सहावी राष्ट्रीय वार्षिक भौतिकोपचार परिषद कायनेसिओकॉन २०२५ पार पडली. एकूण २१० प्रतिनिधी परिषदेस उपस्थित होते. कामाच्या ठिकाणापासून आरोग्यापर्यंत : एर्गोनॉमिक्स आणि भौतिकोपचार हा या परिषदेचा विषय होता.

 

विविध भौतिकोपचार महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी एकूण ८६ वैज्ञानिक शोधनिबंध सादर केले. कलकत्ता येथील फिजिओलॉजिचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ गंगोपाध्याय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे व संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ सुचित्रा नागरेयांचे हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उदघाट्न केले. याप्रसंगी माईर्स भौतिकोपचार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल घोडे, एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिपा नायर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, माईर्स भौतिकोपचार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. अनुराधा सुतार तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.

Advertisement

 

या परिषदेत चेन्नई येथील प्रेम अर्गो सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुंदर, गुरगाव येथील डॉ. दिपांकर दास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयौजीत विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी मंचानी भाग घेतला होता.

 

सदर कार्यशाळा उत्तमरित्या आयोजित केली याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page