धनगर समाज बांधव व इतिहास प्रेमींनी साजरा केला आनंदोत्सव
पुरंदर :
अटकेपार हिंदवी स्वज्याची पताका फडकावणाऱ्या सुभेदार तुकोजीराव होळकर व होळकर घराण्याच्या इतर वीर पुरुषांच्या समाध्या पुण्यातील होळकर पुल खडकी येथे “होळकर छत्री” नावाने प्रसिद्ध आहेत. सदर “होळकर छत्री” ही शासनाकडून दुर्लक्षित असल्यामुळे व त्यावरील अतिक्रमण झाल्यामुळे समाज बांधवांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण होते. अनेक वेळा या ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. नुकत्याच 30 ऑगस्ट 2024 रोजी याच दुर्लक्षित समाधीस्थळाबाबत लाक्षणिक उपोषण श्री. समीर निकम, राजे होळकर व समाज बांधव यांच्या द्वारे करण्यात आले होते.
श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी ही शासन दरबारी हा विषय लावून धरला. या सर्वांची दखल घेत राज्य शासनाने 16 डिसेंबर 2024 रोजी “होळकर छत्री” राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित करत त्याची प्राथमिक अधिसूचना काढली आहे .
यानिमित्ताने होळकर छत्रीचे अतिक्रमण काढून त्याचे संवर्धन होण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करणारे इतिहास अभ्यासक समीर निकम यांचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांच्या हस्ते समाज बांधवांनच्या वतीने “होळकर छत्री” या ठिकाणी होळकर शाही पगडी, घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यामध्ये मा. मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, उप सचिव सौ.राऊत मॅडम, पुरातत्व विभागाचे श्री. विलास वाहने साहेब , श्री. गोसावी साहेब या सर्वांनीच मोलाचे सहकार्य केले म्हणून त्यांचे आभार भूषणसिंह होळकर राजेंनी मानले.
सदर “होळकर छत्री” बाबत शासनाकडून पाठपुरावा करून समाधी परिसरातील भग्न अवस्थेतील तटबंदी, बुरुज, भग्न स्मारक व मुख्य स्मारक मूळ स्वरूपात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे भूषणसिंह राजे होळकर यांनी सांगितले. “होळकर छत्री” सर्वांना दर्शनासाठी कायम खुली ठेवावी. दर्शनासाठी कोणाला आडवले तर वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ असेही सूचक वक्तव्य भूषणसिंह राजे होळकर यांनी केले.
याप्रसंगी भाजपा नेते गणेशदादा हाके, संभाजी बाप्पू हाके माजी संचालक सन्मित्र बँक हडपसर, माजी पीएसआय वाघमारे साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथमामा काळे , पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाच्या महिला अध्यक्ष मीनाताई थोरात, संघटनेचे संपर्कप्रमुख महादेवअण्णा वाघमोडे, रामटेकडी अध्यक्ष राम बोंद्रे ,उपाध्यक्ष शंकर हांडगे, मांजरी अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, कोथरूड अध्यक्ष राजेंद्र बनणे, रुपेश आखाडे ,गवान शिंदे, संतोष वरक, विजय गोफणे , सोमनाथ देवकाते, विष्णू कुराडे, जेपाल दगडे खडकी अध्यक्ष, बिरुदेव सातपुते, महादेव निर्मळ ,सोमनाथ नजन सर, अनिल भांड सर, व सर्व समाज बांधव उपस्थित होते.