महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे एकदिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आज लोणावळा इथं पार पडलं
लोणावळा :
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे एकदिवसीय राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आज लोणावळा इथं पार पडलं. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शिबिराला सुरुवात झाली.
ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र हुंजे यांनी या शिबिराला संबोधित केलं. सेवादल हे खेड्या-पाड्या आणि वस्त्यावरील प्रत्येक घटकाला भेटून त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घेऊन पक्ष संघटनेपर्यंत पोहचवण्याचं काम करत असतो. प्रत्येक पक्ष संघटनेत सेवादल हे महत्वाचा घटक आहे. सेवादल हे कार्यकर्त्यांमधून नेता घडवण्याची ताकद ठेवतो, पक्ष संघटनेच्या मातृत्वाची भूमिका सेवादल पार पाडत असतो अशी भावना श्री. राजेंद्र हुंजे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार श्री. संजय मिस्किन यांनीही शिबिराला मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या विकासाची धमक असलेला नेता म्हणजे अजितदादा आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवत आज अजितदादा वाटचाल करत आहेत असं संजय मिस्किन म्हणाले. अजितदादांनी महाराष्ट्रात राबवलेल्या विविध विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला. २५ वर्षांपूर्वी अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या रुपात स्मार्ट सिटीची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि हे संपूर्ण देशाने पाहिलं असल्याचं ते म्हणाले.
राष्ट्रवादी सेवा दल पक्षाचं काम पूर्ण निष्ठेने करत आहे. युवा वर्गात राष्ट्रीय एकात्मता जागवण्यासाठी राष्ट्रवादी सेवा दल कार्यतत्पर आहे. भविष्यात आपल्याला सेवा दल अधिकाधिक मजबूत करून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पक्षाचं काम पोहोचवायचंय असं युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण म्हणाले. अजितदादांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचंय असा निर्धार या शिबिरात सूरज चव्हाण यांनी केला.
याप्रसंगी असंघटीत कामगार सेलचे राज्यप्रमुख मनोज व्यवहारे, सेवादलाचे राज्यप्रमुख राजेंद्र लावांघरे, कार्याध्यक्ष शिवाजी बनकर यांनीही शिबिराला संबोधित करतील उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
यावेळी सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश काटकर, पुंडलिक राऊत, हिराताई पवार, सचिन गुप्ता, संतोष आहेर, योगेश धनुष्कर, प्रमोद राजगुरू, जीवन गायकवाड यांच्यासह राज्यभरातून आलेले सेवादलाचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.