विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षाच्या मुलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार

SHARE NOW

मावळ :

मावळ-विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसाने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच चिमुकलीला आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे.ही धक्कादायक घटना नाताळच्या दिवशी म्हणजे बुधवारी. २५ डिसेंबरला घडली. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळ निमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात ड्युटीवर होता.

विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली असता त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवून आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page