*रोटरी क्लब च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने डॉक्टर डे आणि सीए डे चे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवार दि.०१.०७.२०२४ रोजी ॲड. पु. वा. परांजपे विद्यालय तळेगाव दाभाडे येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखाचा मोफत अपघाती विमा देणार असल्याची माहिती रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी दिली. यावेळी तळेगावातील रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या दानामुळे पूर्णपणे निरोगी आयुष्य जगता येते. तरी १८ ते ६५ वयातील सर्वांनी या रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी केले.