*तळेगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तळ्याच्या परिसरात
बुधवारी( दि.०५) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन उमुख्याधिकारी तथा उद्यान विभाग प्रमुख ममता राठोड आणि उद्यान विभाग सहाय्यक विशाल मिंड यांचे मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये कर विभाग अधिकारी विजय शहाणे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, नगर रचना सहाय्यक वीरेंद्र नारगुंडे, आस्थापना विभाग प्रमुख मनीषा चव्हाण, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, NULM विभाग प्रमुख विभा वाणी आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यावेळीमुख्याधिकारी एन. के पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे तसेच लावण्यात आलेल्या वृक्षांची जपणूक करणे किती आवश्यक आहे याबाबतचे मार्गदर्शन केले. याबरोबरच पर्यावरण व्यवस्थापन याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी यांनी सांगितले की पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र वापरले जाते. या अनुशांगाने आपण सर्वांनी पर्यावरण पूरक संसाधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखला तरच पर्यावरण संवर्धन योग्य प्रकारे करता येईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. सुमारे २०० झाडांची लागवड आज या पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली. या उपक्रमासोबतच जुना मुंबई पुणे हाय वे लगत स्वच्छता मोहीम देखील घेण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले.