*राष्ट्रीय विज्ञान दिना ‘निमित्त कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये पुन्हा भरली वैज्ञानिक व रोबोटिक शाळा*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे,

शनिवार दि. 1 मार्च 2025. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, *कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल* मध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय विज्ञान दिन हा विविध वैज्ञानिक प्रयोगाद्वारे , रोबोटिक प्रदर्शन तसेच चित्रकला व हस्तकला प्रदर्शन आणि संगणक प्रयोग प्रदर्शन इत्यादी विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीने संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार मा. श्री. अनिल तानकर हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संदीप काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे ,सौ. सुप्रिया काकडे , सौ सोनल काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती सावंत , पर्यवेक्षिका सौ शुभांगी वनारे , सौ. कीर्ती कुलकर्णी , सौ. श्रावणी देसाई हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व उत्तरोत्तर आपली विज्ञानातील उत्सुकता वाढत जाओ असेही सांगितले. शाळेचे मुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत यांनी देखील आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले विविध कला गुण जोपासून विविध कला कौशल्य आत्मसात करावीत व विज्ञानातील जिज्ञासा जोपासावी असे सांगितले कार्यक्रमात सर्व विज्ञान विषय शिक्षक , सर्व चित्रकला शिक्षक व सर्व संगणक शिक्षकांचा आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या चारही प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक आलेल्या पाहुण्यांसमोर सादर केले. वैज्ञानिक प्रयोगांबरोबरच यावर्षी अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम शाळेने आयोजित केला होता, तो म्हणजे रोबोटिक कार प्रदर्शन व संगणकातील विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी तयार केली व ती पाहुण्यांसमोर सादर केली. यामध्ये शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. चित्रकला व हस्तकला या प्रदर्शनामध्ये देखील विद्यार्थ्यांचे हस्त कौशल्य व चित्र कौशल्य अतिशय सुंदररित्या रेखाटलेले दिसले. तसेच या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आलेल्या अनेक पालकांनी यावरती आपले चांगले मत मांडले. या सर्व कलाविष्कारातून शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण दिसून आले. शाळेने विद्यार्थ्यांसाठी दिलेली ही एक सुवर्णसंधीच होती आणि या विद्यार्थ्यांनी संधीचे सोनेच केले. यासाठी या विद्यार्थ्यांच्या सर्व विषय शिक्षकांनी व इतर शिक्षकांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी अतिशय बारकाईने या सर्व प्रयोगांचे व प्रदर्शनाचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शन हे सौ. डी .मनीमाला, सौ.नीलम म्हात्रेकर व सौ. निशा सराफदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. नववीच्या विद्यार्थिनी कु. साफिया खान व कु. सिद्धी जगताप यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page