पंचायत समिती चौक वडगाव ते महादजी शिंदे उद्यान मुख्य रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करा-मनसे

SHARE NOW

मावळ :

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील पंचायत समिती चौक ते महादजी शिंदे उद्यान या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बऱ्याच महिन्यांपासून रखडलेले असून लोकरे गॅरेज येथील रस्ता रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्याकारणाने त्या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक ओढ्यामध्ये पावसाळ्यापूर्वीची साफसफाई न झाल्यामुळे त्या ठिकाणी मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जात.

Advertisement

 असल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे व दुचाकी चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून सदर रस्ता हा वडगाव शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याकारणाने विद्यार्थी,शेतकऱ्यांची व तालुक्याला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता रखडलेला रस्ता त्वरित पूर्ण करावा या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला सांगून सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे,व नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या नाहक त्रासापासून त्यांची सुटका करावी या मागणीचे निवेदन आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे यांना मा.उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी दिले व पुन्हा जर रस्त्यावरती पाणी साचले तर त्या पाण्यात अभियंता व ठेकेदारांनी कागदाची होडी होडी खेळावी यासाठी त्यांना कागदाच्या होड्या भेट देण्यात आल्या तसेच येत्या चार दिवसात जर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर मनसे स्टाईलने उग्र आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराला धडा शिकवावा लागेल लागेल असा इशारा ही यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला याप्रसंगी मनसे मावळ तालुका मा.अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,मनसे नेते तानाजी तोडकर,मनसे वडगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते,संतोष म्हाळसकर,आदित्य म्हाळसकर प्रणव म्हाळसकर,विकास साबळे,आकाश वारिंगे,सुरज भेगडे, गणेश म्हाळसकर,नवनाथ शिवेकर


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page