*तळेगाव स्टेशन आणि कामशेत येथील अनाथ मुलांना मदत*
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांच्याकडून कामशेत येथील मायेचा हात फाउंडेशन येथील अनाथ मुलांना शालेय साहित्यासाठी धनादेश संस्थेचे अध्यक्ष लिखित नाशिककर आणि सचिव संतोष वीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच तळेगाव स्टेशन येथे अजित फाउंडेशन या अनाथ मुलांसाठीही अनाथ मुलांसाठी धनादेश संस्थेचे अध्यक्ष महेश निंबाळकर आणि विनया निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला .याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार, सुनील भोंगाडे, शंकरगौडा हदीमनी विन्सेंट सालेर, दशरथ जांभुळकर, संदीप मगर आणि मायेचा हात फाउंडेशनचे संचालक उमेश नवघणे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ काळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले रोटरी क्लबचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष खांडगे यांनी वाढदिवसानिमित्त मदत करुन या दोन्ही संस्था समाजामध्ये अनाथ मुलांसाठी उत्तम काम करत असल्याबद्दल दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रशंसा केली.